प्रश्नपत्रिकेत सूचित केलेला शब्द / शीर्षकाचे आवडीच्या बाह्याकारात शब्दार्थाला अनुरूप किंवा मुक्तआविष्कार पद्धतीने योग्य आकारातील अक्षराचे रेखाटन करून आवडीच्या रंगांनी रंगवावे.
सूचित रंगमाध्यम : भूमितीसाठी पेन्सिल आणि / किंवा पेन. अक्षर लेखनासाठी – आवडीचे रंगमाध्यम
मार्गदर्शक सूचना :
सूचना : भूमितीमधील ‘अ’ व ‘ब’ विभागासाठी उत्तरपत्रिकेच्या दोन्ही बाजूंचा उपयोग करण्यात यावा.
विभाग ‘अ’ आणि ‘ब’ दोन्ही विभाग सोडविणे अनिवार्य.
विभाग ‘अ’ मधील पाच कृत्यांपैकी चार कृत्ये आणि विभाग ‘ब’ मधील अक्षरलेखनाचा एक प्रश्न असे एकूण पाच प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
अक्षरलेखन सर्वांसाठी अनिवार्य आहे. अक्षरलेखन केलेले नसेल आणि विभाग ‘अ’ मधील सर्व कृत्ये बरोबर असतील, तरी तो विद्यार्थी अनुत्तीर्ण समजला जाईल.