चौरसाकृती घन (Cube), चतुष्कोनाकृती घन (Square prism), दंडगोल (Cylinder), शंकू (Cone), सूची (Pyramid ) आणि गोल (Sphare) या सरळ उभ्या अवस्थेत ठेवलेल्या घनाकाराचे अनुविक्षेप (Plan) व उद्विक्षेप (Elevation) काढणे.
दिलेल्या विशिष्ट बाह्याकारात दिलेला शब्द, नाव किंवा शीर्षक आकर्षक पद्धतीने रेखाटन करणे.
सौंदर्यनिर्मितीच्या दृष्टीने शब्दार्थाला अनुरूप किंवा कलात्मक व सुसंवादी अक्षरलेखनाचे संयोजन अपेक्षित आहे.
रोमन / देवनागरी किंवा एखाद्या भारतीय लिपीत अक्षरलेखन करावयाचे आहे. अक्षरलेखनासाठी कोणताही प्रकार वापरता येईल.
मार्गदर्शक सूचना :
सूचित रंगमाध्यम : भूमितीसाठी – पेन्सिल किंवा / आणि पेन अक्षर लेखनासाठी – आवडीचे रंगमाध्यम.
साधने : कंपास पेटीतील यांत्रिक साधने, ब्रश इत्यादी.
विभाग ‘अ’ आणि ‘ब’ दोन्ही विभाग सोडविणे अनिवार्य.
विभाग ‘अ’ मधील पाच कृत्यांपैकी चार कृत्ये आणि विभाग ‘ब’ मधील अक्षरलेखनाचा एक प्रश्न असे एकूण पाच प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
अक्षरलेखन सर्वांसाठी अनिवार्य आहे. अक्षरलेखन केलेले नसेल आणि विभाग ‘अ’ मधील सर्व कृत्ये बरोबर असतील, तरी तो विद्यार्थी अनुत्तीर्ण समजला जाईल.